Bookstruck

अवधींच कैशीं जालींत कठीण ...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अवधींच कैशीं जालींत कठीण । माझा भागशीण कोण सांगे ॥१॥

येती मायबापें लोकांचीं भेटाया । तुम्ही माझी माया सांडियेली ॥२॥

बापें नारायणें धरिला अबोला । काय राग धरिला न कळे मज ॥३॥

तुका म्हणे रात्रंदिवस कटे खंती । नये तुमची चितीं कृपा कांहीं ॥४॥

« PreviousChapter ListNext »