Bookstruck

संत तुकाराम - नाहीं कोणी दिलें कठीण उत्...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

नाहीं कोणी दिलें कठीण उत्तर । तरी कां अंतर पडियेलें ॥१॥

म्हणवोनी आतां वियोग न साहे । लांचावला देह संघष्टणें ॥२॥

वेळोवेळां वाचे आळवितों नाम । अधिकचि प्रेम चढ घेतें ॥३॥

तुका म्हणे पांडुरंगे जननीये । घेउनी कडिये बुझावील ॥४॥

« PreviousChapter ListNext »