नाही उरली वसना । तुम्हां ...

नाही उरली वसना । तुम्हां नारायणा पाहतां ॥१॥

उरला नाहीं भेदाभेद । झालें शुध्द अंतर ॥२॥

विटाळाचे होतें जाळे । तुटलें बळें नामाच्या ॥३॥

चौदेहाची तुटली दोरी । म्हणे चोख्याची महारी ॥४॥