शीण वाटतसे मना । नारायणा ...

शीण वाटतसे मना । नारायणा न पाहतां ॥१॥

वांया आचार विचार । सदा मलीन अंतर ॥२ ॥

सोंगाचे ते सोंग । दावी रंग कथेचा ॥३॥

परधनी सदा मन । वरी दावितसे डोलून ॥४॥

ऐसा नर तो दुराचारी । म्हणे चोख्याची महारी ॥५॥