बैसोनी एकांती बोले गुजगोष...

बैसोनी एकांती बोले गुजगोष्टी । घालोनियां मिठी चरणासी ॥१॥

बहु दीस झाली वाटतसे खंती । केधवां भेटती बाई मज ॥२॥

तुम्हांसी तों चाड नाहीं आणिकाची । परी वासना आमुची अनिवार ॥३॥

सोयरा म्हणे चला जाऊं तेथवरी । गुजगोष्टी चारी बोलुं कांही ॥४॥