माझें मन तुमचे चरणीं । तू...

माझें मन तुमचे चरणीं । तूंची माझा देवा धणी ॥१॥

धरणें घेउनी दारांत । बैसलेंसे नाम गात ॥२॥

दुजा धंदा कांही नेणें । तुमचे कृपेचे पोसणें ॥३॥

द्वारी बैसोनी हांका मारी । म्हणे चोख्याची महारी ॥४॥