हीन दीन म्हणोनी कां गा म...

हीन दीन म्हणोनी कां गा मोकलिलें । परी म्यां धरिलें पदरी तुमच्या ॥१॥

आतां मोकलितां नव्हे नित वरी । थोरा साजे थोरी थोरपणें ॥२॥

शरण आलिया दावितासां पाठीं । काय थोर गोष्टी वानूं देवा ॥३॥

सोयरा म्हणे अहो पंढरीनिवास । तुमचा तो ठसा त्रिभुवनी ॥४॥