नामाचा भरंवसा मानिलासे सा...

नामाचा भरंवसा मानिलासे सार । उतरले पार भवनदी ॥१॥

नाम हें सोपें नाम हें सोपें । नाम हें सोपे मुखी गाता ॥२॥

नामाची आवडी सदा सर्वकाळ । नाहीं काळ वेळ नाम गातां ॥३॥

नामेंचि जन तरती संसारी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥