Bookstruck

नवी दृष्टी 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''मला वाटले तुमची मैत्री तुटली. मला वाटले की तो तुला डोळयासमोर आवडत नाही. रविही तसेच म्हणाला.''
''वेडा रवि. माझे मन त्याला काय कळे?''
आनंदराव सायंकाळी एकटेच गावाबाहेरच्या देवळात जात होते. तो त्यांना राईत रवि दिसला.

''काय रे रवि? परीक्षा झाली का? सुटी का लागली?'' त्यांनी विचारले.
''परीक्षेला मी बसत नाही.''
''का?''
''जयंता नि मी एका वर्गात राहू. मी पुढे कसा जाऊ त्याला मागे टाकून? मी घरी आलो निघून.''

''दौलती रागावला नाही?''
''नाही. त्यांच्या डोळयात माझे शब्द ऐकून पाणी आले.''
आनंदराव देवदर्शनास गेले. रवि तेथे पावा वाजवित होता. परंतु आज जयंता कोठे आहे?
''दौलती आहे का घरात?'' उजेडात येऊन आनंदरावांनी विचारले.
दौलती बाहेर आला. त्याला आश्चर्य वाटले.
''या बसा.'' तो म्हणाला.
''आज तुम्ही सारे माझ्याकडे जेवायला या. रवि कुठे आहे?''
''तो अजून निजला आहे. जयंताला केव्हा भेटेन असे त्याला झाले आहे.''

''आज ये म्हणावे, पोटभर भेट. जयंताही उत्सुक आहे.'' आणि रवि आला. दोघे मित्र भेटले, सद्गदित झाले. दोघांचे वडील त्या प्रेम दृश्याकडे बघत होते.

''तुम्ही आमचे गुरु.'' आनंदराव म्हणाले.
''
तुम्ही नवदृष्टी देणारे'' दौलती म्हणाला.

''आम्ही श्रीमंत गरीब भेद दूर करू. सहकारी समाजवाद आणू'' रवि म्हणाला.
''हो आणू.'' जयंता म्हणाला.
''कोणी रे तुम्हांला हे शिकवले?''
''जगांतील आजचे वारे.''

« PreviousChapter ListNext »