Bookstruck

मोठी गोष्ट 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''एक जरा मोठी गोष्ट सांगा. झाडामाडांची सांगा.''

''बरे तर ऐका.''

तो होता लहान बाळ. आई होती सावत्र. ती आपल्या मुलांबाळांना दागिन्यांनी नटवी, सुंदर वस्त्रांनी भूषवी. परंतु आईवेगळया राजाला कोण? एके दिवशी तो घरातून निघून गेला. गाव संपला. नदी संपली आणि जंगल लागले. राज दमला. तेथे रडत बसला. शेवटी त्याला झोप लागली. एक म्हातारी बाई तेथे आली. तिने त्या मुलाचे डोके मांडी घेतले. राजा जागा झाला. तो जवळ एक आजीबाई.

''तुम्ही कोण?'' त्याने विचारले.

''मी रानातली आजीबाई.''

''तुम्ही काय करता?''

''रडणा-यांना हसवते, भुकेल्यांना जेऊ घालते, उघडे असतील त्याला कपडे देते.''
''मला दे आजी.''

''हे समोर लहानसे झाड आहे. त्याच्याजवळ हवे ते माग. परंतु एक गंमत आहे, झाड विचारील, 'ही गोष्ट दुस-याला सांगशील की सांगणार नाहीस?' तर 'सर्वांना सांगेन' असे म्हण बरं का?''

राजाने कबूल केले. समोरच लहानसे झाड होते. त्याच्यावर सर्व रंगांची फुले होती. किती सुंदर दिसत होते! जणू वनदेवीच्या दिवाणखान्यातील ती फुलदाणी होती. नानारंगी नानागंधी फुलांचा तो जणू गुच्छ. राजाने त्या पुष्पवृक्षाला प्रणाम केला.

''काय पाहिजे बाळ?'' झाडाने विचारले.

''मला अन्न हवे.''

''ही घे डबी. यातून नेहमी मिळेल. परंतु हे झाड डबी देते असे कोणाला सांगणार तर नाहीस?''

« PreviousChapter ListNext »