Bookstruck

चिटुकल्या गोष्टी 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मारुतीची गोष्ट :
मारूती हा चिरंजीव आहे. जोवर जगांत रामकथा आहे तोवर मारुतीला मरण नाही.

रामाचा अवतार संपला होता व कृष्णाचा सुरू होता. हिंडता हिंडता तो द्वारका शहराजवळ आला. शहराबाहेरच्या बागेतील वृक्षावर बसला. तेथें पहारेकरी होते. ते त्याला हाकलू लागले.

''ही बळरामांची बाग. चालता हो. बळराम रागावतील.''
''हा कोण बळराम?''
''बळराम द्वारकेचा राजा.''
''जगात एक राम झाला - हा दुसरा बळराम कोण?''

असे म्हणून मारुतीने त्या सर्व पहारेक-यांना शेपटात बांधले आणि दूर भिरकावले. ते रडत बळराम महाराजांकडे आले. त्यांनी सारी हकीगत सांगितली. बळरामाने सैनिक पाठविले. ते येऊन मारुतीला ''माकडा चालतो हो'' म्हणाले.

मारुतीने विचारले, ''तुम्ही कोण?''

''बळराम महाराजांचे सैनिक.''

''हा बळराम कोण?'' असे म्हणून मारुतीने त्यांना शेपटात बांधून भिरकावले.
आता मोठी सेना पाठविण्यांत आली. मारुतीने आपले शेपूट लांबविले व सर्वांना बांधून दूर फेकले. कृष्णाच्या कानावर गोष्टी गेल्या. सर्वांचा गर्व दूर होत आहे हे पाहून त्याला आनंद झाला. मी मी म्हणणारे सारे फेकले जात होते. शेवटी कृष्ण एकाला म्हणाला, ''जा, त्याला सांग की हे शहर रामाचे आहे.''

« PreviousChapter ListNext »