प्रवासी
मन एक गाव, जीवन एक प्रवास,
स्वप्न म्हणजे प्रवासाची दिशा
स्वप्नांसाठी केलेली तडजोड म्हणजे
प्रवासाच्या दिशेचा मार्ग
तडजोडीतुन झालेलं चीज म्हणजे
आनंद आणि समाधान
आणि समाधान म्हणजेच
मन या गावचा प्रवासी