Bookstruck

द.रा. कापरेकर

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

द.रा. कापरेकर (जन्म : डहाणू-ठाणे जिल्हा, महाराष्ट्र, १७ जानेवारी १९०५; मृत्यू : १९८६)) हे देवळाली(नाशिक)मध्ये राहणारे एक जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होते. त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांना गणितातले रँग्लर परांजपे पारितोषिक मिळाले होते. ते नाशिकजवळच्या देवळाली येथे शिक्षक होते आणि १९६२मध्ये निवृत्त झाले. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. धोतर, कोट, टोपी हा त्यांचा नित्याचा वेश होता. नोकरीच्या काळात आणि निवृत्तीनंतरही कापरेकरांचा गणितातील आकड्यांशी खेळ चालूच होता. नोकरीच्या काळात त्यांची यासाठी हेटाळणी होत असे.

महाविद्यालयीन स्तरावर अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध होतात, पण शालेय स्तरावर आणि शाळा मास्तरांकडून असे लेख लिहिले जाणे अतिशय अपवादात्मक असते. दत्तात्रेरय रामचंद्र कापरेकर यांचे लेख हे त्यांतले एक होते.

१९७५ साली अमेरिकेतील प्रा. मार्टिन गार्डिनर यांनी कापरेकरांच्या संशोधनाची दखल घेतली आणि त्यांच्या संशोधनावर आधारित Mathematical Games या सदराखाली Scientific American या मासिकात लेख लिहिला, आणि द.रा. कापरेकर भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाले.

स्वीडनच्या World Dictionary of Mathematics या ग्रंथात द.रा. कापरेकरांच्या नावाचा अंतर्भाव केला आहे. Stefanu Elias Aloysius या लेखकाने "D.R. Kaprekar" नावाचे कापरेकरांचे चरित्र लिहिले आहे.

Chapter ListNext »