Bookstruck

कविता: रोज चालती पाऊले! - निशिगंधा उपासनी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सारे आयुष्य आयुष्य आहे प्रवासाची वाट
चाले रोज भटकंती पाऊलांना रोज वाट

कितीतरी वळणे ही कधी अवघड घाट
जरी थकली पाऊले तरी चालावी ही वाट

काम क्रोध लोभ मोह मद मत्सराची वाट
जरी वाटली कठीण तरी चालावी ही वाट

सत्व रज कधी तम कधी अहंकार दाट
कधी अमृताचे प्याले कधी जहराची लाट

कधी नकोसाही वाटे असा आयुष्याचा थाट
तरी करू नये त्रागा आणि चालावी रे वाट

रोज नाही इथे सुख किंवा आनंदाची लाट
लाभे छोटीशी झुळूक तिचे घ्यावे हाती ताट

आले आपल्या ताटात तीच अमृताची लाट
रोज चालती पाऊले भटकंतीची ही वाट

[ लेखिकेचा पत्ता-  निशिगंधा संजय उपासनी (एम्.एस्सी. बायोटेक्नोलॉजी) ३, गणेशप्रसाद अपार्टमेंट, विजय ममता सिनेमाचे मागे, नाशिक ४२२०११; मोबाईल – ९८२२४५२२४७ ]

« PreviousChapter ListNext »