
अर्धवट राहिलेलं पहिलं प्रेम...
by contact No- 9139000613 8356097558.
अर्धवट राहिलेलं पहिलं प्रेम... कॉलेजचा पहिला दिवस... सर्व काही नवीन आगदी कॉलेजच्या बिल्डिंग पासून ते मित्रमंडळी पर्यंत... डिप्लोमा नंतर डीग्रीला द्वितीय वर्षाला प्रवेश घेतला... द्वितीय वर्षाला प्रवेश म्हंटल की सर्वात उशिरा आमचा प्रवेश... बाकीच्या पोरांनी एकमेकांसोबत एक वर्ष घालवले होते त्यात त्यांचे चांगले ग्रूप झाले होते... आता आश्या परस्थीतीमध्ये मला त्यांच्यात जाऊन मिसळायचं होत... प्रेक्टिकल ला सुरवात झाली पहिलाच दिवस आसल्यामुळे नक्की चालू तरी काय आहे हे समजायला मार्ग नव्हता आणि त्यात प्रेक्टिकल ला लागणार साहित्य सुध्दा नव्हतं... परंतु सुदैवाने माझे सर्व वर्गमित्र खुपच चांगले आणि सदैव मदतीला धावून येणारे होते... आश्याच मित्रांच्या गर्दीत तीही होती... डिप्लोमा केला होता म्हणून थोडी कल्पना होती परंतु प्रेक्टिकलच्या तयारी ने आम्ही गेलोच नव्हतो... नवीन मित्र आसंल्यामुळे आमच्यात जास्त जवळीक नव्हती आणि त्यात मुलींचा तर दूर दूर पर्यंत संबंध नव्हता असं आसंल तरी प्रेक्टिकलमुळे आमचं ओझरत का होईना पण बोलणं होतं होत ... आसंच एक दिवस घरी निवांत बसलो होतो... व्हाट्सअप उघडलं...आणि त्यात अनोळखी नंबर वरून आलेले तो मेसेज पाहिला... अनोळखी नंबरवरून मेसेज आल्यामुळे मी ही कुतुहलाने ओळख विचारली... तिने तिची ओळख करून दिली... मी पण माझी ओळख करून दिली... आसच hii...hello...करता करता कधी मैत्री झाली...त्या मैत्रीच रूपांतर घनिष्ट मैत्रीत झालं...आणि मग काय एकदाच कधी आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो समजलंच नाही... एकमेकांसोबत रोजचं बोलणं, कॉलेजला येताना जाताना सोबत, सगळीकडे आम्ही सोबतच आसायचो... आता आम्ही एकमेकांसोबत राहू शकत नव्हतो... आता पर्यंत आम्ही कधी दोघेच भेटलो नव्हतो नेहमी कोणी नां कोणी तरी सोबत आसायच त्यामुळे आम्हाला एकमेकांना वेळ देता येतं नव्हता... म्हणून आम्ही बाहेर भेटण्याचा प्लान केला... भेटण्याची वेळ ठरली, ठिकाण ठरलं... आता फक्त आतुरता होती ती फक्त तो दिवस उजाडन्याची... तो दिवस उजाडला... आतुरता आसल्यामुळे सकाळी लवकर उठलो... सगळ उरकून आता युध्दासाठी सज्ज झालो होतो... युध्द एवढ्यासाठीच कारण ह्याआधी कधी कोणत्या मुलीला भेटलो नव्हतो... घरातून निघालो... आता पहिलीच भेट म्हंटल्यावर काहीतरी घेऊन गेलंच पहिजे म्हणून गुलाबाचं छान आसं फूल( प्रेमाचं प्रतीक) आणि चांगल्या कार्याची सुरुवात गोड व्हावी म्हणून Dairy Milk silk घेऊन जाण्याचं ठरवलं... ती वाशी स्टेशन ला येऊन थांबली होती आणि मी नेहमी प्रमाणे ह्याही वेळेस उशिरा गेलो होतो परंतु उशीर झाला म्हणून ती मला एक शब्द देखील काहीच बोलली नाही... तिथून आम्ही वाशी मधील मिनी सीसोरला गेलो... मला सुचत नव्हतं नक्की सुरुवात कुठून करू...? कदाचित तिने माझ्या मनातील गोंधळ ओळखला असावा म्हणून तिनेच बोलायला सुरुवात केली... असंच बोलता बोलता तिने माझा हात हातात कधी घेतला हे मला समजलं देखील नाही दोघेही अगदी एकमेकांमध्ये गुरफटून गेलो होतो... एवढे गुरफटलो होतो की सकाळी 10:30 चे दुपारचे 04:00 कधी झाले समजलंच नाही... वेळ खूप झाला होता, तिलाही घरी जायच होतं... मलाही घरी यायचं होतं... मन मात्र तिला सोडून जायला तयार नव्हतं... एकमेकांनी दोघांना मिठी मारली... आसं वाटत होतं की तिला सोडुच नये पण काय करणार दुसरा कोणता पर्याय पण नव्हता म्हणून नाईलाजास्तव तिला सोडावं लागलं... स्टेशन वरून तिला घरी जाण्यासाठी ट्रेन मध्ये बसवून दिलं... आज ती खुपच छान दिसत होती त्याच कारण म्हणजे तिने मी सांगितलेले ड्रेस घातला होता... हल्ली असंच आमचं एकमेकांसोबत वेळ घालवणं वाढलं होतं... माझं कॉलेजला जाण्याचं आता कारण म्हणजे ती झाली होती... आसेच दिवस पुढं पुढं चालले होते... खूप छान आयुष्य जगत होतो... परंतु कुणाची तरी नजर लागली आणि आमच्या दोघात दुरावा निर्माण व्हायला लागला होता... आपल्याशिवाय तिच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आहे आसा संशय माझ्या मनात घर करून बसलं होतं... तासनतास फोन वर ती बोलत रहायची... आमच्यात आता प्रेम कमी आणि चीडचीड जास्त वाढली होती... मी कित्येकदा तिला त्याच्या बद्दल विचारण्याचा प्रयत्न केला परंतु तो फक्त माझा चांगला मित्र आहे म्हणून विषय टाळत असे... मी आजून ही तिच्या स्वतः हून सांगण्याची वाट बघत होतो... मला आलेला संशय आता सत्यात उतरला होता कारण मी त्यांच व्हाट्सअप च संभाषण पहिलं होतं... तिच्या आयुष्यातील माझं स्थान दुसऱ्या व्यक्तीने घेतंल होतं... कदाचित आता तिला माझी गरज नसावी मला माझ्यामुळे कोणाला त्रास झालेल चालणार नव्हतं म्हणून मी ह्या सर्वातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला... आयुष्यभर सोबत राहण्याचा प्रवास आर्ध्यावरच राहिला... खंत मात्र एकाच गोष्टीची वाटतेय ती म्हणजे जर तिने त्या वेळेस जर सर्व मला सांगितलं आसतं तर कदाचित आज आम्ही चांगले मित्र नक्कीच आसतो... खूप त्रास झाला आणि आजही होतोय कारण माझ्या आयुष्यातल अर्धवट राहिलेल ते पहिलं प्रेम होतं...! ! !
Chapters
Related Books

संग्रह २
by भा. रा. तांबे

Simple Sanskrit
by संकलित

Part 1: The Loss of Friends
by Abhishek Thamke

गीताधर्म और मार्क्सवाद
by स्वामी सहजानन्द सरस्वती

AYODHYA
by Koenraad Elst

Negationaism in India - Concealing the Record of Islam
by Koenraad Elst

Psychology of Prophetism - A Secular Look at the Bible
by Koenraad Elst

Update on the Aryan Invasion Debate
by Koenraad Elst

Arun Shourie Article Collection
by Arun Shourie

Heroic Hindu Resistance to Muslim Invaders
by Sita Ram Goel