Bookstruck

साडेसातीवर रामबाण उपाय

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

महामंत्र:

" ॐ निलांजन समाभासम | रविपुत्रम यमाग्रजम ||
छाया मार्तंड स्म्भूतम | तम नमामि शनैश्र्चरम || "

असे म्हणतात की, ज्यावर शनिची साडेसाती चालू आहे , अशा व्यक्तीने शनि महामंत्राचे २३ हजार जप साडेसात वर्षात करणे अत्यावश्यक आहे. जोपर्यंत जप चालतो तो पर्यंत जातकाला शुध्द सात्विक भोजन करणे आवश्यक आहे. जमिनीवर चटई टाकून झोपणे, ब्रम्हचर्य व्रताचे पालन करणे. शक्यतो हा मंत्र जप एकाच बैठकीत, एकाच स्थानी पूर्ण व्हावा. अजूनही बरेच उपाय शनिच्या साडेसातीवर सुचविलेले आहेत.

शनिग्रहाचे " नीलमणी " हे रत्न सांगितलेले आहे. हे रत्न सर्वात प्रभावी असून ते खरेदी करण्यापूर्वी लाभदायक ठरते किंवा नाही हे बगायला हवे. साधारणतः रत्न जवळ बाळगल्या पासून त्याच्या प्रभावाने १० दिवसांत शुभ किंवा शुभ घटना घडतात. जर या काळात शुभ व लाभदायी घटना घडल्यास त्या रत्नाची अंगठी करून त्या खड्यावर संस्कार करून ती मधल्या बोटात शुभदिनी किंवा शनिवारी वापरण्यास सुरवात करावी.

« PreviousChapter ListNext »