Bookstruck

अभिषेक

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

श्री शनिदेवाच्या दर्शनाला आल्यावर अभिषेक करतात. अभिषेकसाठी इथे पुजारी उपलब्ध असतात. अभिषेकाचा विधी पार पाडण्यासाठी खालील मुख्य वस्तूंचा वापर करण्यात येतो -

नवग्रह शिरोमणी म्हणून शनिग्रहाचा अग्रक्रम लागतो. शनैश्वर हे दैवत जहाल असून दैवताला प्रसन्न करण्यासाठी भक्ती भावाने पूजा करावी व त्यात स्नेह वृद्धिंगत करावा. हया जहाल दैवतात स्नेह निर्माण करण्यासाठी तेलाचा जास्तीत जास्त वापर करतात. अभिषेक शक्यतो तेलाचाच केला जातो. तो एक आवर्तण, रुद्र, लघुरुद्र, व महारुद्र या प्रकारात केला जातो. यामुळे आपली मनोकामना पूर्ण होते.

तेल सव्वा किलो, सव्वा पाव , सव्वा छटाक या प्रमाणात वापरतात. श्रीफळ खारीक, खोबरे, सुपारी, तांदूळ, हळद, कुंकू, गुलाल, निळ, खडीसाखर, रुईचे फुल, पेढे, काळे कापड, दही, दुध इत्यादी पूजेसाठी वापरतात. तसेच आपली पीडा, वेदना, संकट नाहीसे होण्यासाठी कवडी, बिब्बा, उडीद, खिळा, टाचणी, व साळीचे तांदूळ वाहतात म्हणजे इडा पीडा नाहीसे होते.

जर नवस कबुल केला असेल त्याची पूर्तता करण्यासाठी बंदा रुपया, चांदीचा घोडा, त्रिशूळ, धातूचे नारळ, लोखंडी वस्तू कढई, घमेले वगैरे घोडा, म्हैस, गाय इ. प्राणी आपल्या परिस्थितीनुसार वाहतात किंवा जसा नवस कबुल केला असेल तसा वाहतात.

भारतीय संस्कृती महासागरा समान आहे ज्याच्या तळाशी माहिती नाही काय - काय लपलेले आहे. ज्या प्रमाणे अनेक नद्यांचे पाणी एकत्र होऊन समुद्र तयार होतो त्या प्रमाणे अनेक सांस्कृतिक परंपरा, जीवन शैली आणि मुल्यांना एकत्र ओवून भारतीय संस्कृतीने आपले वर्तमान रूप धारण केले आहे. ती जड नाही, सतत विकासमान संस्कृती आहे.

« PreviousChapter ListNext »