कवितेच्या जन्मकहाण्या...
मायेची ममता सांगते कविता
बापाचे कष्टही मांडते कविता
उपकाराची त्यांच्या मानावी धन्यता
म्हणुनी जन्मते माझी कविता
प्रेमाचा बंध जोडते कविता
विरहाच्या दुःखात रडते कविता
मुक्या भावना व्यक्त व्हाव्या
म्हणुनी जन्मते माझी कविता
समाजमनाची व्यथा जाणते कविता
पुरुषोत्तमाला घडवते कविता
दुर्गुणाला खडे बोल सुनावते कविता
विद्रोही म्हणुनी जन्मते कविता
मेल्या मनात स्फूर्ती फुलवते कविता
कोमेजल्या फुलाला खुलवते कविता
अन्याया वाचा फोडते कविता
शौर्यगीत म्हणुनी जन्मते कविता
शाब्दिक कोट्यानी हसवते कविता
शब्दच्या धारेने घायाळ करते कविता
दुभंगलेल्या समाजाचा उद्धार व्हावा
या उद्धेशाने जन्मते कविता