Bookstruck

देशबंधू दास 38

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'देशबंधूची अध्यात्मिकता पाहिली!'

देशबंधूंना बरे वाटत आहे असे महात्माजींना वाटले. ते बंगालच्या दौर्‍या वर पुन्हा निघाले. महात्माजींनी या भेटीचे वर्णन करताना लिहिले, 'या दोन दिवसांत मी देशबंधूंच्या अधिक जवळ गेलो. त्यांची अध्यात्मिकता मी पाहिली. देशबंधूंना मी यथार्थपणे जाणले.'

रामनामाची किती सुंदर प्रथा


मरणापूर्वी चार दिवस ते एकदा म्हणाले. 'मी मरताना रामनाम म्हणत मरावे ही प्रथा किती सुंदर आहे. रोग, दुःख, शोक, चितां सारे दूर करण्याची, सर्वांचा विसर पाडण्याची शक्ति या रामनामात आहे. प्रभूच्या नामसंकीर्तनात जशी ही शक्ति आहे, तशी कशातही नाही.'

एके दिवशी म्हणाले, 'कित्येक वर्षांपूर्वी एक वृध्द वैष्णव मी पाहिला होता. 'यादवाय माधवाय गोविंदाय नमो नमः' हे शब्द तो वृध्द कसे पण उच्चारी! ते शब्द माझ्या कानांत घुमत आहेत. तसा मस्त करणारा ध्वनी मी पुन्हा कधी ऐकला नाही.'

« PreviousChapter ListNext »