Bookstruck

नऊवारी साडी – शिल्पा कोटगिरे, पुणे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

9404241270 / 9370061478

(पारंपारिक वेशभूषा या लेख मालिकेतील हा पहिला भाग आहे)

नऊवारी साडी म्हटले की आपल्यासमोर महाराष्ट्रीयन पारंपरिक घरंदाज स्त्री उभी राहते.  

पहिल्यांदा महाराष्ट्रात नऊवारी साडी नेसली जात असे.  त्यामध्ये वेगवेगळे प्रकार असायचे जसे,  ब्राह्मणी,  पेशवाई,  कोळी,  लावणी इत्यादी.  साडीचा प्रत्येक प्रकार कामाच्या स्वरूपानुसार नेसला जायचा.  नऊवारी नेसून घोड्यावर बसून युद्ध सुद्धा लढली जायची.

पण आता सुद्धा लहान मुलींपासून सर्व वयोगटामध्ये नऊवारी साडीची आवड आहे.  रेडीमेड नऊवारी साडी नेसायला सहज सोपी आहे.  सलवार प्रमाणे झटपट नेसू शकतो.  यामध्ये पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम आहे,  त्यामुळे ती फॅशनमध्ये आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम,  लग्नकार्य,  तसेच गणपती,  दिवाळी,  दसरा यासारख्या सणांना आता रेडीमेड नऊवारी साडी वापरली जाते.

तरुण पिढीमध्ये फॅशन ट्रेंड बदलताना दिसतात.  गेल्या काही वर्षांमध्ये नऊवरीचे पारंपरिक व आधुनिक असे फॅशनेबल ट्रेंडी रूप आपल्यासमोर आले आहे.  कॉलेजचे स्नेहसंमेलन,  फॅन्सी ड्रेस स्पर्धा,  सोसायट्यांमधील सण समारंभासाठी किंवा ऑफिसमधील संस्कृतिक कार्यक्रम यानिमित्त रेडीमेड नऊवारी साडी नेसण्याची फॅशन आलेली आहे.

या रेडीमेड नऊवारी साड्या अनेक पारंपरिक आणि फॅशनेबल प्रकारात उपलब्ध आहेत: जसे ब्राह्मणी नऊवारी साडी,  पेशवाई साडी,  जिजाऊ साडी,  मस्तानी साडी,  शाही मस्तानी साडी,  राज नंदिनी साडी इत्यादी अशा फॅशनेबल प्रकरणांमुळे स्त्री अतिशय सुंदर घरंदाज नटखट तसेच करारी दिसते.  अशी ही नऊवारी साडी आमच्याकडे सर्व प्रकारात उपलब्ध आहे त्याचबरोबर गौरीसाठी नऊवारी साडी शिवून मिळते.

आरंभच्या या अंकातील मुखपृष्ठावर नेसलेली नऊवारी साडी आणि वेशभूषा ही आम्ही बनवलेली आहे.  त्याला मुखपृष्ठावर स्थान दिल्याने आरंभ टीमची मी शतश: आभारी आहे.

« PreviousChapter ListNext »