Bookstruck

सत्य - भरत उपासनी, नाशिक

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

br1957u@gmail.com
8055852978


चालू आहे तेच सत्य आहे.!  
जे ज्या क्षणात पुढे येतं.  ते त्या क्षणाचं सत्य आहे.!
दोन क्षणात दोन वेगळी सत्य असतात.!
ती दोन्हीही त्या त्या क्षणाची सत्य असतात.!
ह्या दोहोंच्या मध्ये उभं राहून जेव्हा पहावं.
तेव्हाच ही दोन्ही सत्य जाणवतात.!
ते ते प्रत्येक क्षणी.   त्या त्या क्षणाचं सत्य असतं.!
सत्य हे प्रत्येकाचं प्रत्येक क्षणी वेगळं असतं.!
ते ते त्याच्यापुरतं. त्या त्या क्षणाचं सत्य असतं.!
सत्य हे परिवर्तनीय असतं.!
प्रत्येकाचं सत्य त्याचं त्याच्यापुरतं समग्र असतं.!
समग्रतेने त्या त्या क्षणाचं.  त्या त्या समग्रतेचं.  समग्र सत्य असतं.!

« PreviousChapter ListNext »