Bookstruck

चारोळी: दु:ख आणि जिद्द - विलास गायकवाड, लातूर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

फोन: 8605026835

हृदयी साठवूनी दु:खे आभाळाएवढी,
हर्ष मुखावरी पेरूनी वावरते.
येईल काय कुणा त्या ममतेचा ठाव,
अशी ती जननी,फक्त तिचेच नाव आई या जगी शोभते.

जिद्द आमुच्या पंखात आहे उडण्याची,
तेव्हा ही दलदल तरी आम्हां काय रोखेल?
ज्ञानाने पेटवलेली ज्योत ती भीमाची,
तुफानातही नव्या जोमाने प्रकाशेल.

प्रा.गायकवाड विलास.
मिलिंद क.महा.लातूर.
8605026835

« PreviousChapter ListNext »