Bookstruck

कविता: आठवणी - सुवर्णा कांबळे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

जेव्हा जाते मी तुझ्यापासून दूर  ।
आपोआप नयनांना येतो पूर  ।।

कंठ येतो बघ दाटून ।
मन गेले  गहिवरून  ।।

आठवणी येता तुझ्या एकांती मी बसते ।
अवतीभोवती दृष्टी फिरविता तुझेच रूप डोळ्यात वसते ।।

तुझ्या पावित्र्याचे कसे मोजू मोल ।
जीवनात तुझ्याविना सावरू कसा तोल ।।

आठवून तुझ्या सुख -दुःखाच्या आठवणी ।
कबुली देते आहे तुझी जन्मोजन्मी ऋणी ।।

तुलाच मान आहे ईश्वराबरोबरीने  ।
'आई ' तुझ्याच आठवणी हृदयात कोरल्यात मनाने ।।

« PreviousChapter ListNext »