Bookstruck

महाभारतातल्या

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
महाभारतातल्या १६५व्या अध्यायात अर्जुनाच निवत्कावाच दानवांशी झालेल्या अतिमानवी युद्धात इत्थंभूत वर्णन येत-----'निवातकवच नामक दानव समुद्राच्यामध्ये दुर्ग बांधून त्यात राहत आहेत. त्यांची संख्या ३ कोटीच्या घरात आहे. त्याचं रूप , बाल , आणि तेज देवांसमानाच आहे.' हि माहिती देवून अर्जुन युधिष्ठिराला सांगतो, "इंद्रान स्वत: आपल्या हातान माझ्या मस्तकावर एक दिव्य किरीट (?) घातला.... मी जेव्हा त्या भागात (आकाशमार्गान) पोहचलो तेव्हा उंच आणि घोर लता उसळणाऱ्या समुद्राला पाहिलं. त्या फेसाळलेल्या सागरात रत्नांनी भरलेल्या सहस्त्रो नावा तरंगत होत्या. सागरात विशालकाय कासव आणि तश्याच मगरी आणि विशाल मासे होते.' निवातकवचांशी युद्ध करण्याकरता अर्जुनाच विमान भूमीवर उतरत होत तेव्हा ते 'पृथ्वी'वरच उतरल्याचे वर्णन आहे. म्हणजे अर्जुन-निवातकवच युद्ध हे कुठे अंतराळात छेडल गेल नव्हत तर ते पृथ्वीवरच खेळल गेल होत, हे स्पष्ट होत. पृथ्वीवर असा कोणता प्रदेश आहे कि जिथल्या समुद्रात विशालकाय कासव आहेत किंवा होती ? रूप,बाल आणि तेज हे देवांसमान असणारा असा निवातकवच दानवांचा वंश कुठे असेल ? त्या दानवांनी देवांनाच पराभव करून त्यांच्या नगरावर भव्य वस्तूंवर कब्जा केला होता, तशा देवांच्या वास्तू, नगर पृथ्वीवर कुठे असतील?अर्जुनाला आकाशमार्गान त्या पदेशात जाण्यासाठी काही तास लागले होते.कोणत्या भागाचा हा निर्देश आहे? ध्रुवीय प्रदेशातून देवांच विमान अरुणाला घेऊन नेमक कोणत्या दिशेला गेल असेल? वरील प्रश्नाचे एकच उत्तर येत. ते म्हणजे दक्षिण अमेरिका ! दक्षिण अमेरिकेतल्या गँलापागोस बेटाभोवतीच्या सागरत आजही विशालकाय कसाव आहेत. ती बेत आजही सुरक्षित आहेत.तिथून बरोबर उत्तरेकडेमेक्सिको आहे. उंचेपुरे, देखणे, बलवान लोक आजही तेथे आहेत.मेक्षिकोमध्येच काही पिरामिड आहेत, प्राचीन वेधशाळा आहेत. मेक्षिकोमधिल पाल्केन येथील मायालोकांच्या पौराणिक पिरामिडमध्ये एका शिलाखंडावर अग्निबानात बसलेला अंतराळवीर कोरलेला आहे. हे माया लोक अतिशय बुद्धिमान होती. त्यांचीच माती कुंठीत करणाऱ्या कॅलेंडर्सचा आणि गणितांचा वारसा जगाला दिला आहे. त्यांच्या कॅलेंडरमध्ये चार कोटी वर्षाची गणित करून ठेवलेली आहेत. शुक्रवाराच वर्ष ५८४ दिवसाचं आहे आणि पृथ्वीवरह वर्ष ३६५.२४२० दिवसाचं आहे, हि गोष्ट हजारो वर्षापूर्वीच्या माया लोकांना ज्ञात होती. पृथ्वीवरच्या आजच्या वर्षाचा अचूक अंदाज आहे३६५.२४२२ दिवसांचा! आज प्रख्यात असणारा आणि बहुतेक कम्प्युटरच्या सहाय्याने शोधला गेलेला गेलेला सुप्रसिध्द व्हेनुशियन सिद्धांतमाया लोकांनी हजारो वर्ष पूर्वीचा मांडला होता हि आश्चर्याची बाबच म्हटली पाहिजे. या सिद्धांतानुसार सर्व कालचक्र दर ३७९६० दिवसांनी पुन्हा जुळतात. या प्राचीन लोकांना पूर्ण खात्री होती कि आकाशातल्या ताऱ्यांवर वस्ती आहे आणि पृथ्वीवर आलेले 'देव' हे वृषभ राशीतील ताराकापुंजातून आले होते. आज आपण देवांच्या संदर्भात आकाशाकडे बोट करतो, हा संस्कार प्राचीन काळातल्या वास्तवातेतूनच आला असावा का ? माया संस्कृतीचा उगम आज अनाकलनीय आहे. दहा हजार वर्षापूर्वी माया संस्कृती अत्यंत पुढारलेली होती याचे सबळ पुरावे मिळतात.मायणी तत्कालीन भौतिक प्रगतीचा इतिहास वेगवेगळ्या खुणा आणि आकृत्यांच्या सहाय्यान अनेक हस्तालीखीतामधून लिहून ठेवला होता. तो दुर्मिळ खजिना देवांच्या आगमानासंदर्भात, त्यांच्या वास्तव्यासंदर्भात आणि त्याकाळात साधलेल्या भौतिक प्रगतीच्या संदर्भात आज निश्चित दिशादर्शक ठरला असता. पतंतू दुर्दैवान बिशप डीयागो डी लांडा यां मायांच्या कित्येक हस्तलिखितांची होळी करून टाकली! आपल अधिष्ठान समाजात अधिक बळकट व्हावं या हेतून अश्या धर्मांधांनी प्राचीन इतिहासात डोकावून बघण्याची कवाड कायमची बंद करून टाकली. सत्याची मुस्कटदाबी केली. परंतु सत्य हे सत्य असत. ते लपून थोडाच राहत ? बिशप डीयागोन केलेल्या विध्वसांतून माया लोकांची केवळ तीव हस्तलिखित बचावली. माद्रिद कोडेक्स, ड्रेस्डेन कोडेक्सची चित्र आपल्याला खगोलशास्त्रीय गणित, शुक्र, आणि चंद्र यांच्या भ्रमणकक्षा समजावतात. परंतु मायांच्या बचावलेल्या हस्तलिखितांचा आर्थ मुळीच लागत नाही. कारण निरनिराळ्या अगम्य खुणा आणि आकृत्या वापरून त्यांनी लेखन केल आहे. खुणा, आकृत्याची अदलाबदल केली कि लगेच अर्थ बदलतो. त्यामुळे जे काही हाती लागलेले ज्ञानकण आहेत ते आपल्याला पूर्णतः माहिती होऊ शकत नाही. पण मेक्सिकोमध्ये मायांनी निर्माण केलेल्या वस्तू आजही बघायला मिळतात. मेक्सिकोमधील पालेन्क पिरामिड, चिचेन इट्झा, होंडूरासमधील कोपान, ग्वाटेमालातील टिकल या ठिकाणची सर्व बव्य बंध काम माया लोकांच्या दिनदर्शिकेप्रमाणे बांधलेली आहेत हि गोष्ट आज सिद्ध झाली आहे.
« PreviousChapter ListNext »