Bookstruck

सम्राट कनिष्क

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

    मौर्य साम्राज्य भारतातील एक महान साम्राज्य होते. चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोकाच्या काळात ते प्रचंड विस्तारले होते. या महान साम्राज्याचे भरभराटीचे दिवस अशोकाच्या मृत्यूनंतर संपले..हळूहळू इतर गणाराज्ये वाढू लागली..त्यात ग्रीकांनी आक्रमणे चालू केली. अशात मौऱ्यांच्या शेजारी छोटी छोटी गणराज्य तयार होऊ लागली. 
       मध्यपूर्व आशियातून छोट्या टोळ्या भारतात आल्या. त्यात एका टोळीने कुशाण साम्राज्याची स्थापना केली. या कुशाण वंशातील सर्वात महान राजा म्हणजे कनिष्क होय.इसवी सनाच्या पहिल्या शतकात काश्मीरमध्ये त्यांनी राज्य स्थापन केले. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजांनी केली . नाण्यांवर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाण शासकांनी सुरू केली.
 राजा कनिष्क याने साम्राज्याचा मोठा विस्तार केला. कनिष्काचे साम्राज्य हे काबूलपासून ते वाराणसीपर्यंत पसरले होते. कनिष्काच्या कालखंडातली सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत .
    सम्राट कनिष्काने  पाटलीपुत्रवर हल्ला केला आणि पाटलीपुत्र जिंकून घेतले. त्यावेळी त्यांनी आपल्यासोबत तेथील अनेक विद्वानांना नेले. त्यांचा प्रभाव कनिष्कांवर पडला आणि तो बुद्ध धर्माच्या जवळ जाऊ लागला. पुढे त्यांनी बौद्ध धर्मही स्वीकारला . त्या काळात त्यांनी ग्रंथांचे पुनर्लेखन केले. बरेच  साहित्य निर्माण केले. पाली भाषेच्या ऐवजी संस्कृत भाषेचा वापर वाढला. त्याने बुद्ध ग्रंथांचे संस्कृतमध्ये रूपांतर करून घेतले. महायान संप्रदायाची निर्मिती याच कालखंडात झाली.
ग्रीक, इराणी देव-देवता, चंद्र, सूर्य, वायू, अग्नी देवता यांच्या मूर्ती तसेच उभी असलेली बुद्धमूर्ती पाहावयास मिळते. त्याबरोबर असलेले शिक्क्यांवर सोन्याच्या नाण्यावर एका बाजूस स्वतःची प्रतिमा व दुसऱ्या बाजूला वैदिक, रोमन आणि पर्शिअन देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या होत्या.
   त्याच्या दरबारात चरक नावाचा प्रसिद्ध राजवैद्य होता.
२३ वर्षे राज्य केल्यानंतर इ.स. १०१ मधे कनिष्क मृत्यू पावला. दुसऱ्या शतकात कुशाण राज्याचा ऱ्हास होऊ लागला आणि चौथ्या शतकानंतर कुशाण राज्य संपुष्टात आले.
     भारताच्या इतिहासात कनिष्क राजाचा कालावधी महत्त्वाचा ठरतो.

« PreviousChapter ListNext »