Bookstruck

बघा बरं पटतय का?

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
बघा बरं पटतय का?

स्वयंपाक घर नेहमीच बोलतं आपल्यासोबत,
पोळपाट लगेच नाही धुतला तर फुगतो,
तवा भिजत ठेवला तर गंजतो.
कुकर नाही वेळेत बंद केला तर जळतो,
दुधाकडं नाही लक्ष दिलं तर ते उतु जातं,
गॅस नाही वेळेत बंद केला तर भाजी करपते.
तरी लोक म्हणतात,
यांना किचन मध्ये काय काम असतं.
बाहेर खाणार्यांची मर्जी सांभाळा,
आत सामानाची.
किती कठीण असतो स्री जन्म...
सगळं स्वयंपाक घरातील सामान, आणि घरातल्यांची मनं सांभाळते ती उत्तम गृहिणी.
जी निर्जीव वस्तु देखील जीवापाड जपते.
पोळपाट फुगु देत नाही,
तवा गंजु देत नाही,
कुकर डागु देत नाही,
भाजी जळु देत नाही,
दुध चुकुन गेलंच उतु तर कृष्णार्पण म्हणुन मोकळी होते.
प्रत्येक स्त्री मधे उत्तम आई दडलेलीच असते.
ती माणसांच्या मुड सोबत घरातील वस्तुंचीही काळजी घेते.
आजच्या सर्वच जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार्या माझ्या सर्व सख्यांना मानाचा मुजरा!💐💐💐💐
😊
« PreviousChapter ListNext »