Bookstruck

भक्ती

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
भक्ती
शब्द देवदूत झाले
प्राण दिव्यरूप झाले
तीन प्रहर शकून झाले
श्वास शब्दमय झाले
मोहमाया उरली कुठे?
अंतरंग भक्तिमय झाले
भाव शब्दवेणा झाले
मौनावर शब्दद्युत खेळते
धाकातून मुक्त झाले
ध्यासातून उमटू आले
काळजावर आरूढले
मन शब्ददास झाले
प्राणदिप तेजाळले
शब्दपालखीचे भोई झाले
शब्द ह्रदयमंदिरी पुजीले
जगण्यावर जगणे आले
त्याच शब्दभक्तीतूनी
जन्म पुन्हा पुन्हा मागते
श्वास भक्तीवर ठेवूनी
शब्दमेणा सजवीते
भोळ्याभाबड्याच भक्तीचे
रंगरूप माझ्यातून प्रसवते
शब्द आस्थेवर मांडते
जन्म शब्दांना वाहते
शब्द कृष्णमय झाले
शब्दपांडूरंगी न्हाले
भक्तिमय शब्द सोहळा
शब्द देवदूत झाले

सौ वर्षा तुपे
« PreviousChapter ListNext »