Bookstruck

#285327346

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
सतहसत सही केली आपण… त्याच गोष्टीवर आता हसू नाही येत,दाटून येतंय नुसतं पुन्हा कानात आवाज घुमला

" जाऊद्या ना मॅडम, तुम्ही कशाला मनाला लावून घेता एवढं, जीव गेलाय त्याचा"

ही ट्रेन बघा, या ट्रेनखाली रोज कित्ती जणांचे जीव जातात.. आपल्याला काय? कुणाचं तरी कोणतरी गेलं, कुणीतरी आज घरी परतणार नाही. कबुतर नाही परतलं, ते घोरपडीच पिल्लू नाहीं परतलं, तसाच सुहास नाही परतला. मालतीला भडभडून आलं... तिनं डोळे बंद केले, नेहमी प्रमाणे कानात हेडफोन घुसवला...पण कानातल्या गोंगाटाने मनातला गोंगाट शमत नाही...

तिने देशमुखांच्या घराची बेल वाजवली कधी वाटलेलं का आपण ह्या कामासाठी इथे येऊ? सुहास म्हणाला होता

"वाचलीच तर.. सुरक्षित असुदे" हो मी वाचले सुहास..

दार उघडलं गेलं, अशा कारणासाठी आल्यावर कुणीच आपलं स्वागत करत नाही म्हणजे तशी प्रथा आहे आपल्यात..

“या बसा”

“हो,आहेत कादेशमुख?”

“बोलावते, अहो मालती साठे आल्यात”

“नमस्कार,पेपर्स आणलेत?”, देशमुख आले.

"हो..हे डेथ सर्टिफिकेट..हे सुहासच्या कंपनीचे लेटर..या प्रीमियमच्या पावत्या आणि हा आम्हा तिघांचा शेवटचा एकत्र फोटो.." हे सगळं म्हणजे आम्ही कायदेशीर रित्या एकत्र होतो. आम्ही दोन शरीरे एकत्र होतो. आता एक शरीर नाही. ते मेलं….म्हणून हे डेथ सर्टिफिकेट…..पण त्या शरीरानं दिलेल्या आठवणी मरत नाहीत….त्या शरीराने दाखवलेली स्वप्न दिसतंच राहतात… यापुढे सुहास या देहाशी निगडित कुठलीही आठवण मालतीला येणार नाही आलीच तर त्यास सर्वस्वीकंपनी जबाबदार राहील.असलं काही मिळतं काहो देशमुख ? तिला विचारावसं वाटत होतं.

"कागदपत्र आहेत ना सगळी?"

"हो"

“मग येऊ मी ?

“हे काही पेपर्स आहेत हे जरा भरून देता का?”

"हो" म्हणताना मालतीचा कंठ दाटून आला. वैऱ्यावरवरही येऊ नये अशा अनेक वेळां पैकी ही एक वेळ..

“उद्या आणलेत तरी चालेल”

“हो,येते मी”

“अहो थांबा ,पाऊस खूप भरलाय, चहातरी घेऊन जा”

“नाही....... नको”

मालती अगदी चहाचा चटका लागावा तशी बोलली

“अहो,अर्धा कप तरी घ्या”

“नको नको”

“पाऊस थांबे पर्यंत तरी बसा”

“नाही, येते मी, आईकडे चाललेय, पुन्हा उशीर नको”

इकडे चहा, बाहेर पाऊस कुठं जाऊ मी? कुठंच जायचं नाही, असं काही करता येईल का? विरघळेल का हे शरीर असंच हवेत? थांबत का नाहीत माझें श्वास, ठोके आणि मीही… का होत नाही माझी ती निर्जीव घोरपड किंवा ते करूण कबुतर? मागे दार धाडकन बंद झाल्याचा आवाज झाला.

मालतीने मोट्ठा श्वास घेतला आणि दिलं झोकून सुहास नसलेल्या या भौतिक जगात. बाह्यजगात सुहास नाही आणि अंतर्जगात त्याच्याशिवाय काही नाही..बाह्यजगात तो नाही म्हणून चालणारे सगळे सोपस्कार.

अंतर्जगात त्याची साद, त्याच्या आठवणी, सगळंच निराकार दाखवताही येत नाही आणि साठवताही येत नाही,त्याचं असणं..नुसतं वाहत राहतं. आताही बघ,कसा मला छत्रीत घट्ट धरून चाललाय, या जगाकडे लक्ष सुद्धा नाही त्याचं, फक्त माझा बनून राहिलाय हा....

“अगं माले काय गं? किती भिजलीस!”

“हं”

“अगं, एवढी कशी भिजलीस?”

“नाही अगं..छत्री विसरले”

“मग हातात काय आहे?”

“अगं छत्री उघडायला विसरले, सुहास होताना….”

“काय?”

“नाही..काही नाही”



“काय झालंय ह्या पोरीला देव जाणे, कपडे बदलून घे.. मी आलेच..”

आईकडला टीव्ही उगाच काहीतरी बडबडत होता… मालती मात्र त्या बंद दाराकडे पाहत उभी होती…

“अगं जा”

“हो, जाते”

कुठलीही गोष्ट मालू बरोबर बोलायची असेल तर चहा हवाच, चहाने मालुचा मूड एकदम बदलायचा आईला हे पक्कं ठाऊक होतं. आईने दोन कप चहा आणला.

“मालू, तू विचार केलासका?”

“नाही..मी तुला आधीच सांगितलंय आणि तू आल्याआल्या तोच विषय नको काढत जाऊ गं आई...”

“अगं पण, माले तुझ्यासमोर आयुष्य आहे.”

“हो,तेच म्हणतेय मी माझ्यासमोर श्रेया आहे....मला खरंच लग्नाची काही गरज वाटत नाही……..”

“आता लगेच नाही म्हणत मी, आपण पाहू तरी..”

“करायचचं नाहीये तर पाहायचं कशाला?”

“माले,अगं ऐकना गं”

“आई, मला नोकरी आहे, चांगलं सासर आहे, खंबीर माहेर आहे, का गं लग्न ? माझं ओझं झालंय का तुला?”, मालतीचा गळा दाटून आला.

“तसं नाही गं…अज्जिबात नाही..पण...”

“पण काय?”

“………..”

“पण काय? आई..?”

“शरीराच्या म्हणून काही गरजा असतात की नाही?”

“आई काय बोलतेयस तू? शरीरसुखासाठी लग्न करतात लोकं, मान्य आहे मला, पण फक्त शरीरसुखासाठीच लग्न नाही होऊ शकत गं,………..”

“तुझ्या समोर आयुष्य आहे मालू…तू तरुण आहेस..”

आई अगदी काकुळतीला आली होती.

“तुला हाच विषय काढायचा असेल तर येते मी” मालतीने बॅग उचलली

“अगं चहा तर घेऊन जा”

“तुला माहित नाही का मी चहा सोडलाय ते? मुद्दामून देते आहेस का?”,

बाहेर धोधो पाऊस पडत होता मालतीने घड्याळात पाहिलं..दहा वाजत आले होते…श्रेया झोपलीही असेल कुणासाठी धावत घरी जायचं? दिशाहीन झालंय नुसतं फक्त शरीरासाठी लग्न कसं होऊ शकतं?

पावसाने चांगलाच जोर धरला होता छत्री असूनही ती चिंब भिजली होती..ज्या वेळेस सुहास गेला आपण ही का नाही गे#285327346
« PreviousChapter ListNext »