Bookstruck

#285327330

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
Online....

Online ती ही असते, Online मी ही असतो

Online ती ही असते, Online मी ही असतो.
बोलावसं तीला ही वाटतं, बोलावसं मला ही वाटतं.
परंतु बोलत ती ही नाही, बोलत मी ही नाही.

Last seen माझे ती ही सततं पाहतं असते,
Last seen तिचे मी ही सततं पाहतं असतो.
मॅसेज पाठवावा मला ही वाटतं,
मॅसेज पाठवावा तिला ही वाटतं.
परंतु पाठवत ती ही नाही, पाठवत मी ही नाही.

प्रत्येक स्टेटस अपडेट माझे तिच्यासाठी असतातं,
प्रत्येक स्टेटस अपडेट तिचे माझ्यासाठीचं असतातं.
वाचत ती ही असते, वाचत मी ही असतो.
स्टेटस वाचुन वाटतं बोलाव भरभरुन एकमेकांशी,
परंतु ती ही बोलत नसते आणि मी ही बोलत नसतो.

Online प्रेम हे कदाचित असचं असतं,
एकमेकांचे प्रोफाईल पिक्चर पाहताचं प्रत्येक स्टेटस मधून बहरत असतं.
कधीतरी बोलेल ती कधीतरी बोलेन मी,
याचं आशेवर ते फक्त आणि फक्त विसंबलेलं असतं.
copy paste#285327330
« PreviousChapter ListNext »