Bookstruck

#285327385

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
✍🏻 *उपकार..*
आपले रक्ताचे नाते नसताना आपल्या जीवनासाठी उपयुक्त व आवश्यक असा सहयोग देणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या सर्व सदह्रदयी व्यक्तीत्वांचे आपल्यावर सदैव ॠण असते.. त्यांचे आपण कधीही ॠण फेडू शकत नाही.. त्यामुळे त्यांच्यांशी सदैव कृतज्ञतेने वागावे.. त्यांच्या विचारांचा सदैव आदर करावा.. शक्य तितके त्यांना सहकार्य करावे.. त्यांच्या सदैव सहवासात राहून आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्यावे..
आपल्या जीवनात अडचणी आणणाऱ्या व दुःख निर्माण करणाऱ्या लोकांपासून सदैव दुर रहावे.. त्यांच्याशी झगडण्यात, त्यांना शिक्षा देण्यात किंवा त्यांना धडा शिकविण्यात काहीही अर्थ नसतो.. अशा लोकांमुळे आपला आणखी वेळ जाऊ नये, दुःख मिळू नये.. याचा विचार करता अशा लोकांपासून शक्य तितक्या लवकर दुर निघुन जावे, त्यांच्यापासून शक्य तितके सुरक्षित अंतर ठेवून आपले जीवन जगावे..
आपले जीवन अनमोल आहे.. आपल्या पुढील पिढीचा व आपल्यावर उपकार करणाऱ्यांचा विचार करता आपण आपल्या जीवनात उत्कर्ष कसा निर्माण करता येईल, याचा विचार करावा.. आपल्या स्वकार्यावर लक्ष केंद्रित करून आपल्या जीवनाचे स्वहित साधावे. आपल्याला जन्म दिलेल्या ईश्वराचे, त्याच्या प्रकृतीचे, मातृभूमीचे व आपल्याला जीवनभर सेवा पुरवणाऱ्या समाजातील सर्व लोकांचे उपकार फेडावेत..
*सर्वजीत*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💞🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻#285327385
« PreviousChapter ListNext »