Bookstruck

#285327387

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
"जा सांग लक्ष्मणा, सांग रामराजाला
"समजला" म्हणावे, "न्याय तुझा सीतेला

अग्‍नीत घेतली उडी उजळली कुडी
पटविले तेव्हा, होतास तिथे तू देवा
केलास न्याय परि उलटा, ठरले कुलटा
केलीस सफळ मम सेवा
शोभले तुझ्या वंशास, दिगंत यशास चढेल तजेला"

जा सांग "जानकी अजुनी राहि जिवंत
जो रघुवंशाचा अंश तिच्या उदरात
तोवरी प्राण कोंडील देहकोषात
राणीची भिकारीण आज होय, रघुराज तिला सांभाळा"

रचना : वसंत बापट
संगीतकार : जी. एन्‌. जोशी
स्वर : गीता दत्त

खुप सूंदर आणि दुर्मिळ गाणं आहे ते, सहसा लागत नाही रेडियोवर म्हणून share केलं.
वसंत बापटांचं मराठी गीत गातेय बंगाली गायिका गीता दत्त. तिची पुण्यतिथी होती (20 जुलै 1972). भावपूर्ण काळीज विदीर्ण करणारं हे गीत काळजीपूर्वक ऐका, अनुभवा.#285327387
« PreviousChapter ListNext »