Bookstruck

#285327424

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
गोव्याचे जेवण स्वर्गसुख..❤❤

काय भारी असतो ना गोव्याच्या जेवणाचा थाट..
कधी नारळाच्या तेलात तळलेली सुरमई आणी बांगडयच्या हुमणात त्रिफळाचा घमघमाट..
एका बाजुला तारल्याचे किंवा बांगड्याचे झणझणीत आंबट तिखट..किंवा सुकट बांगड्याची किस्मुर..
काय मस्त सुगंध दरवळतो ना जरी असलो 4 पावले दुर..

वेगळ्या वेगळ्या प्रकारची मसाल्याची तोणाक किंवा कोळंबी/तिसर्याचे डांगर..
आम्हा गोंयकारासाठी हेच आमचे स्टारटर ..
शिवराक असेल तर कैरीची किंवा आमाड्याची उडीदमेथी ,पौष्टिक,चविष्ट खतखत आणी मूगागाठी..
गोड सांगता होते जेवणाची जेव्हा शेवटी असते पायस किंवा काजुबीयो घातलेली मणगण्याची वाटी..

तोंडी लावायला जर असेल भरलेल्या कैरीचे लोणचे / खोबरेल तेल लावलेला तारवटी मिर्चीचा पापड..तर "Icing on the cake"..
शेंगा,कैरी,आमाडे घालुन करता येतात आम्हाला कोळंबीच्या हुमणाचे प्रकार अनेक..
अहो अस्सल गोंयकाराने दाट नारळाची सोलकडी कशी विसरावी..
अर्धा भात सोलकडीने जेवल्याशिवाय जेवणाची सांगता कशी व्हावी??

अश्या माझ्या मायेने आणी आपुलकीने बनवलेल्या गोव्याच्या जेवणासमोर 5 star चे जेवण पण फिक वाटत..
काय करु पावलोपावली माझा गोवा आणी गोव्याचे जेवण फार फार आठवत...😊

Https://bookstruck.app#285327424
« PreviousChapter ListNext »