Bookstruck

वजन व पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपाय

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

1. पपईचे नियमित सेवन करावे. हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

2. दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे.

3. पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या, दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल.

4. आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल.

5. वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोन्ड दुध, टोन्ड दही आणि टोन्ड पनीरचा वापर करावा. या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात, परंतु पोट भरलेले जाणवते.

6. दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे. कमीत कमी 4 किलोमीटर चालण्याचा नियम करावा. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करावी. जर तुम्ही रात्री 8:30 नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या. रात्री हलका आहार घ्यावा.

7. वजन लवकर कमी करण्याची इच्छा असेल तर जास्तप्रमाणात पांढरे पदार्थ (बटाटे, मैदा, साखर, तांदूळ) कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ ( डाळी, गहू, गजर, पालक, सफरचंद, पपई) खाण्यावर जास्त भर द्यावा.

Chapter ListNext »