Bookstruck

शरीरावरील तिळ आणि मस चामखीळ न दुखता मुळापासून काढण्याचा उपाय

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आवश्य जाणून घ्या तो उपाय

जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर तीळ किंवा मस कधी कधी नको त्या ठिकाणी असणाऱ्या या गोष्टी तुमच्या सौंदर्यात बाधा आणतात. तर मस् किंवा तीळ हे शरीराच्या कोणत्याही भागावर येतात पण चेहऱ्यावर कधी ते खुलून ही दिसतात तर कधी वाईट ही दिसतात त्यामुळे ते काढणे हाच यावर पर्याय असतो पण त्यासाठी सर्जरी करणे आपल्या ला नको असते मग करून बघा घराच्या घरी हे घरगुती वस्तूंपासून उपाय न दुःखता गायब होतील तीळ आणि मस.

१. रोज दिवसातून दोन वेळा व्हिटॅमिन ई असणाऱ्या तेलात आल्याचा रस मिसळून त्या जागी लावा एक ते दोन आठवड्यात गायब होतात.

२. सुकलेले अंजीर याचा रस दिवसातून चार वेळा त्या ठिकाणी लावा आणि काही वेळाने पाण्याने धुवून काढा यातील एसिड सारखे घटक तुमच्या चेहऱ्यावर चे मस आणि तीळ निघून जाण्यास मदत करतात.

३. मेथीचे दाणे रात्र भर पाण्यात भिजत ठेवा सकाळी अनोषा पोटी हे पाणी प्या यामुळे तुमच्या समस्या दूर होतील शिवाय यामुळे तुमचं शरीर ही निरोगी राहील.

४. एरंडाचे तेल याचा वापर करूनही मस गायब होतात. एरंडाच्या तेलात चिमूटभर बेकिंग सोडा मिसळा आणि त्या ठिकाणी लावा २ ते ३ आठवड्यात तुम्हाला यापासून सुटका मिळेल.

५. सफरचंद च व्हिनेगर कापसाच्या बोळ्याने त्या ठिकाणी लावा १५ मिनिट ठेऊन द्या याच्या मदतीने तुम्हाला मस पासून सुटका मिळेल........

« PreviousChapter ListNext »