Bookstruck

आठवण ..

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

का तू सोडून गेलास मला.. सारखी तुझीच आठवण येते...
तू आसपास नसताना खूपच एकटे एकटे वाटते..

मित्र-मैत्रिणींची सोबत असली तरी सतत तुझी उणीव भासते ..
त्यांच्या लक्षात येण्या आधीच पटकन डोळ्यातले पाणी पुसून टाकते ...

गर्दीतून चालत असताना सारखा तुझाच भास होतो..
आता तुझा हात माझ्या हातात नाही या गोष्टीचा अत्यंत त्रास होतो...

कधी चुकूनच समोर दिसलास तर तुझ्याशी ते खोटे खोटे हसणे नकोसे वाटते..
पण तुझ्या नजरेतून माझ्यासाठी असलेले प्रेम ओसंडून वाहताना पाहून मी मनोमनी आनंदी होते..

शांत चांदण्या रात्री मंद हवेची झुळूक जणू तुझीच आठवण करून देते... 
लवकरच तू मला तुझ्यापाशी पुन्हा बोलावशील हीच एकुलती एक आशा मनाशी बाळगते.. 

रात्री उशिरापर्यंत डोळ्याला डोळा लागत नाही...
परंतु स्वप्नात तरी तुझ्याशी निवांत गप्पा मारता येतील म्हणून करते निजण्याची घाई...

संपूर्ण दिवस तुझ्याच आठवणींनी बहरत असतो ..
तू माझ्याजवळ नसूनही सतत माझ्या सोबतच असतोस..

« PreviousChapter ListNext »