नको रे प्रेमात पडूस माझ्या वेड्या मना ..

का रे प्रेमाची आस तू जागवलीस पुन्हा ...
नको रे प्रेमात पडूस माझ्या वेड्या मना ..

समाजाला नाही रे मान्य तुझ्या निष्पाप भावनांचा निरागसपणा ...
नको रे प्रेमात पडूस माझ्या वेड्या मना ...

अखेरीस जर पडणारच असेल प्रेमाच्या नक्षीवर धर्मरूपी मीठाचा खडा ...
नको रे प्रेमात पडूस माझ्या वेड्या मना ..

आता पुसून टाक त्या जुन्या आठवणींच्या खुणा ...
नको रे पुन्हा प्रेमात पडूस माझ्या वेड्या मना ...