Bookstruck

सहज भेटलो होतो आपण..

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सहज  भेटलो  होतो  आपण  फक्त  काही  क्षणांसाठी ...
पण  वाटलं  नव्हतं  तेव्हा  ही  भेट  होती  एक  नवीन  ओळख  होण्यासाठी ...

भेट  झाली..ओळख  वाढली..सगळं  अगदी  छान  होतं माझ्यासाठी..
आणि  एकाएकी  तू  हात  पुढे  केलास  एका  निरागस  मैत्रीसाठी...

दिवस  सरले..महिने  सरले ...
आता  मैत्री  झाली  होती  खास  अगदी  दोघांसाठी ...
आणि  अशातच  मला  जाणवलं  की  मी  जगू  लागले  होते  केवळ  तुझ्यासाठी ...

करू  लागले  खटपट  तुला  कायम  हसत  ठेवण्यासाठी ..
मनी   एकच  ध्यास  होता - "करीन   काहीपण  तुझ्यासाठी ..!!"

प्रेमाची  ही  भावना  जरी  होती  नवी  माझ्यासाठी ..
तरी  माहीत  होतं  मनाला  की  ती  जगणार  होती  फक्त  काही  काळासाठी ...

अखेर  धाडस  केलं  आणि  मन  मोकळं  केलं  तुझ्यापाशी ..
जरी  ठाऊक  होतं  मनाला  की  तू  कधीच  नव्हतास  माझ्यासाठी ....

हे  सर्व  काही  खूपच अनपेक्षित  होतं  तुझ्यासाठी ...
तू  काही  न  बोलताच  तुझा  नकार  पोहोचला होता  माझ्यापाशी ...

मी  खचले ..मी  रडले ..आठवणीत  तुझ्या  झुरले ..
पण  आता  मला  कळून  चुकलं  होतं की  मी  प्रेमात  पडले  होते  पुन्हा  त्यात  कधीही  न  पडण्यासाठी ..

अजूनही  झगडते  मी  स्वतःशी ..हे  सर्व  काही  विसरण्यासाठी ..
नव्हतंच  ते  प्रेमाचं  विश्व  कधी  माझ्यासाठी ..
तरी  प्रेमात  पडले  मी ..हे  देवच  जाणे  कशासाठी ...

« PreviousChapter ListNext »