Bookstruck

निसर्गाची किमया

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter List

एक फुल आले जास्वंदीचे ,
आयुष्य घेऊन एका दिवसाचे.
बहरलेले तरीही पूर्ण चैतन्याने,
आपणही असेच जगावे पुर्णतेने.

काँक्रीट फुटपाथच्या भेगांमधून
गवताचे लहान तुरे डोकावतात ..
एखादी गोस्ट कितीही अशक्य वाटली तरी
कुठूनतरी तिला मार्ग सापडतात ..

हिवाळ्याच्या ऋतूत
झाडावरची सर्व पाने गळतात ,
पण वसंत येताच
पुन्हा ती सळसळता .

स्वतःपेक्षा दहापट मोठ्या वजनाच्या वस्तू
मुंग्या उचलत छोट्या 

 

कमाल आहे त्या इंद्रधनुष्याची
आकाशात उधळण घालतो रंगांची .

एका वाळूच्या कणापासुन
कालव बनवतो मोती .
निसर्गाच्या किमयेची
अनेक उदाहरणे आहेत आपल्या भोवती .

(रक्षा भराडिया यांच्या 'The Alchemy Of Nature ' या इंग्रजी लेखाचे थोडक्यात पद्यात रूपांतर. )

Chapter List