Bookstruck

8. ग्रँडमाज बॅग ऑफ स्टोरिज

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ग्रँडमाज बॅग ऑफ स्टोरिज ह्या मध्ये लहान मुलांसाठी रंजक कथा आहे. लहानपणी ऐकलेल्या  प्राणी आणि रहस्यमय व्यक्तिरेखा यांच्या भोवती फिरणार्‍या आजीआजोबांच्या गोष्टींना आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे हे पुस्तक आहे. हे कथानक आपल्याला आपल्या बालपणीच्या दुनियेत घेउन जाते. या कथेत आनंद, कृष्णा, रघु आणि मीना हे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आपल्या आजोळी येतात. तेव्हा ते सुट्टी आज्जीच्या रंजक कथा ऐकत ऐकत व्यतीत करतात.  त्यामध्ये आजी त्यांना राजा आणि रंक, द ओनियन प्रिंसेस, माकड आणि उंदिर , दडलेल्या खजिन्यांच्या गोष्टी सांगत असे. या कथा मनोरंजन करतात आणि बोधप्रद असतात. या ऐकल्यामुळे एक प्रकारचा अवर्णनीय आनंद मिळतो

« PreviousChapter ListNext »