Bookstruck

शैक्षणिक कारकिर्द.

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कार्व्हर यांची शैक्षणिक कारकिर्द संशोधक अाणि प्राध्यापक अशी चालु झाली. तत्कालीन मुख्याध्यापक वॉशिंग्टन यांनी कार्व्हरना सन १९११ साली एक पत्र लिहिले होते. त्या पत्रात कार्व्हरनी वॉशिंग्टन यांच्या म्हणण्यानुसार शेती प्रयोगक्षेत्रात ठराविक पिकाची पेरणी केली नव्हती. ह्या पत्राचे कारण ज्या विभागात कार्व्हर रुजु झाले होते तो विभाग मागिल दहा वर्षांपासुन अधिक वर्षे मुख्याध्यापक वॉशिंग्टन यांच्या अखत्यारीत होता. याच वेळात कार्व्हर यांनी मुख्याध्यापकांकडे केवळ स्वतःच्या वापरासाठी एक प्रयोगशाळा आणि काही उपकरणे , साहित्य यांची मागणी केली होती. शिवाय अापल्याल शिक्षण वर्गांपासुन सवलत मिळावी अशीही मागणी केली होती. परंतु, वॉशिंग्टन यांनी त्यांच्या सगळ्या मागण्या नामंजुर केल्या. वॉशिंग्टन यांना कार्व्हरच्या शिक्षण पद्दतीचे आणि त्याच्या शोधांचे कौतुक वाटत असे.परंतु कार्व्हर यांच्या व्यवस्थापनाच्या कोैशल्याबद्दल टिप्पणी करताना त्यांनी सांगितले की, "जेव्हा वर्गांचे आयोजन करण्याची वेळ येते तेव्हा योग्यरित्या आयोजित केलेल्या आणि मोठ्या शाळेच्या किंवा शाळेचा विभाग व्यवस्थापित करण्याची आवश्यक असणारी क्षमतेचा अभाव वाटतो. हेच जेव्हा व्यावहारिकदृष्ट्या प्रायोगिकतत्वावर शेतीच्या व्यवस्थापनाची, आर्थिक परिणामाची शहानिशा करण्याची वेळ येते तेव्हाही कार्व्हरच्या ठायी क्षमतेंचा आभाव जाणवतो." कार्व्हरनी वेळोवेळी प्रयोगासाठी लागणारी उपकरणे न मिळाल्याने मुख्याध्यापकांकडे तक्रार केली होती.शिवाय विद्यापीठाच्या समितिच्या मिटिंगमध्ये होणार्‍या वादां बद्दल ही त्यांनी मुख्याध्यापकांना सांगितले होते. तत्कालीन मुख्याध्यापक वॉशिंग्टन यांनी कार्व्हर ना त्यांच्या आठवणी संग्रहात ज्याचे नाव"माय लार्जर एज्युकेशन : बिइंग चॅप्टर्स फ्रॉम माय एकस्पिरियन्स" असे आहे यामध्ये खुप नावाजले आहे. ते म्हणतात " कार्व्हर म्हणजे माझ्या परिचयातील कृष्णवर्णीयांमधला एक सच्चा वैज्ञानिक आहे." मुख्याध्यापक वॉशिंग्टन हे सन १९१५ मध्ये वारले.

टस्केगी विद्यापीठात शिकवत असताना कार्व्हर "गॅमा सिग्मा चॅप्टर ऑफ फी बीटा सिग्मा फेटर्निटी" यात सहभागी झाले होते. त्यांनी १९३० साली टस्केगी , अलबामा येथे झालेल्या गुप्त बैठकीत भाषण दिले होते. त्या बैठकीत कार्व्हरनी एक तडफदार पण भावुक असे भाषण दिले होते.सन १९१५ ते १९२३ या काळात कार्व्हर यांनी आपले पुर्ण लक्ष संशोधन आणि प्रयोगांवर केंद्रित केले. कार्व्हर यांनी शेंगदाण्याच्या नव नवीन रेसिपी, रताळी, सोयाबीनस्, पिकान, यांवर संशोधन अाणि प्रयोग चालु केले होते. कार्व्हर यांनी "नॅशनल कॉनफरन्स ऑफ द पिनट ग्रोअरस् असोसिएशन" यामध्ये सन १९२० साली दिलेल्या भाषणाने त्यांना अधिकच प्रसिद्धी मिळाली आणि त्यांची ख्याती वाढली. यामध्ये त्यांनी आयात केलेल्या शेंगदाण्याच्या प्रतीवर अधिक लक्ष केंद्रित केले होते. या कालखंडात कार्व्हर हे त्यांच्या काळातील सर्वात प्रसिद्ध आफ्रिकन अमेरिकन होते.

« PreviousChapter ListNext »