Bookstruck

सोपे झाले....

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter List

म्हणतो कोणी शेती करणे सोपे झाले.
आयुष्याचा डाव खेळणे सोपे झाले.

ही शीतलता आतांशी मज भावत नाही.
सदासर्वदा उन्हात जळणे सोपे झाले.

भ्रष्ट माजल्या सत्तेला हाताशी धरुनी.
कंचकोवळे अंकुर खुडणे सोपे झाले.

हवे कशाला कट्यार, चाकू, गुप्ती, बिचवे.
केसाने पण गळा कापणे सोपे झाले.

हिरव्या, पिवळ्या, लाल, केशरी रंगांवरुनी.
माणसास कळपात वाटणे सोपे झाले

दुष्काळावर वचनांची खैरात वाटली.
तोंडाला मग पाने पुसणे सोपे झाले.

Chapter List