Bookstruck

स्त्री शक्ती....

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

कैक पाकळ्या
चुरगाळल्या जातात
रोज नव्याने येथे..
कित्येक दिवे मालवल्या
जातात अंधारात येथे..
कधी मिळाला का न्याय
असती  गीता जेथे.
अन्यायानेचं सावरलं जातं
थरथरणारं काळीज येथे..
कैक मेणबत्या गेल्या
उजळून आभाळ येथे..
कैक अश्रुंचे बांध
मोकळे झालेत येथे..
स्मरणार्थ त्यांच्या
उभारले चौथरे येथे..
वर्षानुवर्ष दिवा लावूनी
जमतो समुदाय जेथे..
स्त्री शक्तीचा महिमा
गातात खोटाचं येथे..
न्यायासाठी चौथरे
बोलतील का येथे
बोलतील का येथे...

संजय सावळे

Chapter ListNext »