Bookstruck

या वर्षीच्या हनुमान जयंतीला येणारे मुहुर्त

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

 

२७ एप्रिल २०२१ ला येणारी हनुमान जयंती म्हणजे सिद्धी योग आणि व्यतीपात योगाचे एकत्र येणे आहे. हनुमान जयंती दिवशी संध्यकाळी ८ वाजुन ३ मिनिटांपर्यंत सिद्धी योग आहे. त्यानंतर व्यतीपात योग चालु होणार आहे. साधारणपणे जेव्हा योग्य वार , तिथी आणि नक्षत्र एकत्र येते तेंव्हा सिद्धी योग येतो.

सिद्धि योगाचे फायदे

सिद्धि योगचा स्वामी गणपती आहे. या योगात अापण एखाद्या कार्याची सुरुवात करु ईच्छिता तर नक्की करा. ते कार्य सिद्धीस नक्कीच जाईल. त्यासाठी कोणतेही विघ्न येणार नाही. हा दिवस हनुमानाचे नामस्मरण करण्यासाठी उत्तम आहे. या दिवशी हनुमानाच्या मुर्तीचे पुजन विशेष फलदायी ठरु शकते. या सिद्धी योगात जन्माला येणारे अर्भक नशीबवान समजले जाते. त्याच्यावर धनाचा वर्षाव होईलच असे नाही. परंतु त्याला कधीही अन्न , वस्त्र आणि धन कमी पडणार नाही. हा जसा शुभ योग आहे तसाच त्याच्या मागोमाग अशुभ योग याच दिवशी येतो. या अश्या एकाच दिवशी येणार्‍या शुभ-अशुभ योगामुळे आपल्या आयुष्यात सुखाबरोबर दुःख आणि दुःखानंतर सुख हे येतच असे नियती सुचवु ईच्छिते.

व्यतीपात योगाची व्याप्ती

व्यतीपात योग अशुभ मानला जातो. या योगात कोणतेही शुभकार्य सुरु करणे वर्जित मानले जाते. त्या कार्याची फलप्राप्ती होत नाही. या वेळेत शुभकार्य करण्या ऐवजी मंत्र जाप, गुरु पुजा,  उपवास, संध्या ई करणे अत्यंत महत्वाचे आहे. 

 

Chapter ListNext »