Bookstruck

पुन्हा नव्याने...

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

आज पुन्हा नव्याने
बेधुंद झालो जरासा,
धुंद डोळ्यात तुझ्या
बनलो आभाळ जरासा...

वात जळून विझले दिवे
झालो अंधार जरासा.
उजाडलो सरतांना झालो
चांदण्याचा चंद्र जरासा...

होता चेहरा लाजलेला
मीही लाजलो जरासा,
दरवळलो वेणीतून
होऊन गजरा जरासा...

भावनेचा स्पर्श
झालो आधार जरासा,
संग किड्यांच्या
झालो काजवा जरासा...

सरली रात्र लागला
डोळा जरासा,
झालो बेधुंद
आज पुन्हा जरासा...

संजय सावळे

Chapter ListNext »