Bookstruck

मनुष्य प्राणी अंतराळात जास्तीत जास्त किती दिवस राहू शकतो?

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आपल्यापैकी बऱ्याच जणांनी 'द मार्शियन' हा चित्रपट पाहिला असेल. त्यात मॅट डॅमॉनने मंगळावर स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी धडपड केली होती, चित्रपटामध्ये ते बघायला छान आणि उत्सुकतापूर्ण वाटत असलं तरी मानव अंतराळात किती काळ जगू शकेल हा अनेकांना पडलेला गमतीदार आणि औत्सुक्यपूर्ण प्रश्न आहे.

https://qphs.fs.quoracdn.net/main-qimg-be4efb508c24bebf54769d55faabbffc

थोडक्यात सांगायचे तर उत्तर अस्पष्ट आहे. तंत्रज्ञान सतत विकसित होत आहे आणि अंतराळवीर अंतराळातील निरोगी 'जीवनशैली' टिकवून ठेवू शकेल अशा दिवसांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

उदाहरण द्यायचे झाले तर, मनुष्याने अंतराळात घालवलेला प्रदीर्घ कालावधी 437 दिवस आहे. हा पराक्रम रशियन अंतराळवीर वलेरी पोलीकोव्ह यांनी केला होता.

शारीरिक परिणाम

मानवी शरीर गुरुत्वाकर्षण परिस्थितीत कार्य करण्यास विकसित झाले आहे. याचा अर्थ असा आहे की अंतराळ आपल्यासाठी अनुकूल नाही. जेव्हा पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाविरूद्ध स्नायू सतत काम करत असतात, तेव्हा ते अंतराळात अशक्त आणि कमकुवत होऊ लागतात. यात हृदयाचा देखील समावेश आहे.

रेडिएशनचा धोका

रेडिएशन हा आणखी एक गंभीर धोका आहे, ज्यामध्ये अंतराळवीरांचा सतत सोलर रेडिएशन, गॅलॅक्टिक कॉस्मिक रेडिएशन, भौगोलिकदृष्ट्या बांधील किरणोत्सर्गीकरण आणि सौर लौकिक कण यांसह अनेक प्रकारच्या ऊर्जेशी संबंध येतो. ज्यामुळे कँसर, एपिजनेटिक प्रभाव आणि मृत्यू देखील होतो. रेडिएशनमुळे शारीरिक कार्ये किंवा हाडांमध्ये देखील बिघाड होऊ शकतो.रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि डोळ्यांमध्ये मोतीबिंदू होण्याची शक्यता असते. शास्त्रज्ञ यावर काम करत असले तरी,अंतराळवीरांना अजूनही गॅमा किरण आणि एनर्जेटिक न्यूट्रॉनपासून किरणोत्सर्गाचा धोका आहे.

यापेक्षा मानवी शरीराला अनुकूल गुरुत्वाकर्षण आणि मुबलक ऑक्सिजन असलेली आपली पृथ्वीच बरी

« PreviousChapter ListNext »