Bookstruck

टायटॅनिक जहाज का बुडाले?

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

10 एप्रिल 1912 रोजी टायटॅनिकने आपला प्रवास साउथॅम्पटन, इंग्लंड येथुन सुरु केला. सर्वात अणुभवी कॅप्टन स्मिथ या जहाजाचे कप्तान होते व हा प्रवास संपताच ते निवृत्त होणार होते. बंदरातुन बाहेर पडत असतांनाच टायटॅनिकच्या जोराने जवळ उभ्या असलेल्या एस एस न्युयॉर्क या जहाजाचा दोर तुटला व ते टायटॅनिक जवळ सरकू लागले. टायटॅनिक व एस एस न्युयॉर्क यांची धडक टाळण्यात अखेर यश आले. एका टगबोटीने एस एस न्युयॉर्कला टायटॅनिक पासुन केवळ ४ मीटर अंतरावरुन वळवण्यात यश मिळवले. पुढे आणखी २ ठिकाणी थांबत टायटॅनिकने २२४० जणांसकट प्रवास सुरु केला असला, तरीही जहाजाच्या पूर्ण क्षमतेपेक्षा कमी प्रवासी जहाजावर होते. टायटॅनिक वर प्रवाशांमध्ये ३ वर्ग होते. प्रथम (३२९ प्रवासी) , द्वितिय (२८५प्रवासी)व तृतीय (७१० प्रवासी). प्रथम वर्गाच्या प्रवाशांची राहण्याची सोय वरच्या मजल्यांवर होती तर तृतीय वर्गाचे प्रवासी सर्वात खालच्या मजल्यांवर होते.

टायटॅनिक जहाजाच्या डिझाईन व बांधणीमध्ये अनेक अनुभवी अभियंत्यांचा सहभाग होता. त्याच्या बांधणीसाठी त्या काळातील सर्वात अद्ययावत उत्पादन तंत्रे वापरण्यात आलेली होती. तसेच ह्या जहाजामध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांचा वापर करण्यात आला होता. असे असतानाही हे जहाज पहिल्याच सफरीमध्ये बुडाले ह्यामुळे अनेक तज्ज्ञांना धक्का बसला.

टायटॅनिकला सतत हिमनगाबाबत इशारे मिळत होते. त्यानंतर अमेरिका नावाच्या स्टिमरने टायटॅनिकला मार्गात हिमनग असल्याचा संदेश रविवार १४ एप्रिल दुपारी १३.४५ ला पाठवला. यावेळी बिनतारी संदेश सांभाळण्या व्यक्तींकडे प्रवाशांची संदेश वहणाची प्रमुख कामगिरी असल्याने यासंदेशाला त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. त्याच संध्याकाळी मेसाबा जहाजाने मार्गात हिमनग असल्याचा संदेश असाच वाया गेला. त्याच रात्री ११:४० वाजता टायटॅनिक किनारयापासुन ४०० मैलांवर होते आणि टायटॅनिक वरील टेहाळणी पथकाला जहाजाच्या सरळ रेषेतच हिमनग आढळला. तो संदेश ताबडतोब जहाजाच्या केबिनमध्ये गेला. त्यावेळी कार्यरत असणाऱ्या अधिकारयाने ताबडतोब जहाज डावीकडे वळवण्याचे आदेश दिले. बरेच प्रयत्न करून जहाजाची दिशा बदलण्यात आली. तरी टायटॅनिक ची सरळ धडक टाळण्यात जरी यश आले असले तरी जहाज पुर्णपणे बचावले नाही. टायटॅनिक च्या उजव्या बाजुचा पाण्याखाली २० फुट खोलीवर असणारा भाग हिमनगावर घासला गेला, व या भागात झालेल्या भेगांतुन पाणी वेगाने आत घुसले. तळाकडील मजले पाण्याने भरताच टायटॅनिक चा मागील पाण्याखाली गेला ज्यामुळे पाणी आणखी वेगाने आत शिरु लागले.

जास्त प्रमाणात प्रवासी मृत्यूमुखी पडण्याचे प्रमुख कारणे -

« PreviousChapter ListNext »