Bookstruck

प्रसंग 12

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

फ्लॅशबॅक

Ext./आतल्या बाजूस. एक रूम. प्रसंगाची वेळ 6pm. ( सायंकाळ.)
( चाळीत सखू आणि एक माणूस दौलत दोघे आहेत, निशाही पलीकडेच बसलेली आहे. अशोक चालत कामावरून घरी येत आहे.)

दौलत क्या टोकण मियां? आज कुछ नया टोकण लाये की नहीं.

अशोक नहीं, कुछ नया नहीं.

सखू का ओ टोकण भाऊजी, ते टोकणाच बंद केल काय इतक्यात?

निशा त्यांच्याच्यानी बंद नसतयं होत, ते लकी हायतं सारखं काय ना काही भेटतं राहतयं, नशीब पाहिजे तर असं नाही का? मला तर लयं आवडतं बाई, टोकणं म्हणजे खजिनाच.
(  बोलताना स्वत:च खुश होते.)

अशोक मी जरा फ्रेश होऊन आलोच, चालू द्या तुमचं.

सखू टोकण भाऊजींना दरवेळी घाईच असते नाहीतरी रमाताई शिवाय जिव कुठं रमणार म्हणा त्यांचा.
( खोचक बोलल्यागत करून हसते.)

( अशोक घरात प्रवेश करतो, रमा घरात झाडून काढत आहे, अशोक काॅटवर बसतो, रमाचं झाडून झालं की तिही शेजारी बसते.)

रमा दमलात?

अशोक दमाचं कसलं आलयं आता, आपण एकदा का संसाराला लागलो की आलचं सगळं.

रमा भारीच तुमचं आपलं. ( हसते.)

अशोक पण रमा, ( असं म्हणून बोलायचं थांबतो.)

रमा बोला की, थांबलात का?

अशोक आपला, वन बीएचके पूर्ण होईल का स्वप्न?

रमा होईल की, प्रारब्धाच्या गोष्टी आहेत. आपण नेहमी चांगलेच आहोत की.

अशोक ते आहेच गं, पण मला आता शंका यायला लागलीये.

रमा का हो? काही खास?

अशोक बघं ना लोन मिळत नाहीये, पैसे अॅडजस्ट करायचा किती प्रयत्न आहे पण होतचं नाहीये.

रमा भाग्याच्या रेषा असतात, कदाचित रवीच्या नशीबी असेल. तो चांगला शिकून घेऊन देईल की.

अशोक तो घेईल म्हणतेसं, पण स्वप्न आपण पाहिलयं ना.

रमा त्याला काय? मुलगाच आहे की तो आपला.

अशोक हो, तोही काही मोठ्ठ करेल एवढं तर सक्षम नक्कीच बनवू मुलाला.

रमा आता कसं गोड बोललात.

अशोक मग तसाचं आता एक कप चहाही मिळेल ना?

रमा करते की, बसा निवांत.

( रमा काॅटवरून उठून गॅसजवळ जाऊन चहा करायला ठेवते. दोघे नवरा बायको एकमेकांकडे पाहत स्मितहास्य करतात. तेवढ्यात रवी ( अजून ६-७ वर्षांचाच आहे.) बाहेरून येतो आणि रमाजवळ जाऊन बसतो.)


            प्रसंग समाप्त

« PreviousChapter ListNext »