Bookstruck

गुढी उभारु आरोग्याची

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एक दिवस पुन्हा नव्याने
आयुष्याच्या क्षितीजावर
संस्कृतीचा  गोडवा पसरे

आस ही मोठी करण्या उधळण
आनंद मनीचा हा प्रतिकुल जरी
सजली धरणी नवपल्लवाने सुगंधी
स्वागत करण्या परि सकल जनांचे

उभारु गुढी चिरकाल आरोग्याची
पुन्हा नव्याने पल्लवित कर सकला
विजयगुढी बांधती तव हरकोनी
चराचरात नांदेल समृद्धी आरोग्याची

ठरो विजयदिवस हा  हरण्या विपदा
लाभेल सुख शांती मनीची सदा सर्वदा

गुढी उभारु गुढी उभारु आरोग्याची
क-करोनि प्रार्थना तव चरणी
मिळो यश हे आम्हां सदा सर्वदा
क्षमा याचना ही तुज आर्जव सकलांची

© मधुरा धायगुडे

« PreviousChapter ListNext »