Bookstruck

नातं शब्दांच...!!!

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

शब्दांचं नातं मनातलं
कधी व्यक्त कधी अवयक्त
शोधत काहीतरी

ओठावर विरघणारं
मौनातील शब्दांच
अबोलतेतही बोलकं

देते साक्ष कौरवांची महाभारताची
तर कधी रामायणातील कर्तव्याची

सीता होवून राहतात शब्द
भासतात सोसण्यासही अवघड
मनातल्या शब्दांचे हे  द्वंद्व

मिळते दाद जेव्हा मिरवतात
कौतुकाने बदलते नशीब तयांचे
होतात आशस्वस्थ पुन्हा पुन्हा
मांडण्या बोलण्या सदा शब्द हे!!

©मधुरा धायगुडे

« PreviousChapter ListNext »