Bookstruck

रशवन ब्राझेल

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

न्यूयॉर्क राज्यातील सर्वात भयावह खून प्रकरण म्हणून रशवन ब्राझेलच्या हत्येची नोंद आहे.

एकोणीस वर्षीय रशवन फेब्रुवारी २००५ मध्ये आपल्या बुशविक, ब्रूकलिनच्या घरून बेपत्ता झाला होता.

१ फेब्रुवारी २००५ रोजी मॅनहॅटनमध्ये दुपारच्या जेवणासाठी आईला भेटायला जाण्यापूर्वी रशवन सकाळी आईच्या अकाऊंटंटला भेटणार होता. त्या दिवशी सकाळी साडेसातच्या सुमारास अज्ञात पुरुषाने रशवनलं बोलवण्यासाठी आपल्या गाडीचा हॉर्न वाजवला ​​आणि ते दोघे एकत्र गेट्स अ‍ॅव्हेन्यू स्टेशनला गेले.

प्रत्यक्षदर्शीं साक्षिदारांनुसार ते दोघे स्टुइव्हसंटच्या बेडफोर्डमधील नॉस्ट्रॅन्ड अव्हेन्यू स्टेशनवरील भुयारी मार्गातून बाहेर पडले. रशवन जिवंत दिसण्याची ही शेवटची वेळ होती. चार दिवसांनंतर न्यूयॉर्क पोस्टच्या म्हणण्यानुसार भुयारी रेल्वे स्थानकावरील ट्रॅकवर शरीराच्या तुकड्यांच्या दोन पिशव्या सापडल्या होत्या.

पीडिताचे बोटाचे ठसे रशवनचे म्हणून ओळखले गेले होते. सबवे स्टेशनवर रशवनसोबत आलेल्या अज्ञात पुरुषाच्या ओळखीविषयी अजून कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही आणि अद्याप या घटनेत कोणताही चौकशी थांबवण्यात आली नाही.

अमेरिकेच्या टी.व्ही.वर मोस्ट वाँटेडवर रशवन प्रकरण किमान पाच वेळा समोर आले होते. तरीही रशवनच्या हत्येचे गूढ शोधण्यात मदत करणारे कोणतेही नवीन पुरावे तयार झाले नाहीत.

« PreviousChapter ListNext »